गुप्तहेरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटकेत असलेले कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ पाकिस्ताननं जारी केला आहे. माझी प्रकृती एकदम उत्तम असल्याचं जाधव यांनी सांगितलं असून पाकिस्तान कडून आपल्याला चांगली वागणूक मिळत असल्याची माहितीही त्यांनी दिली. आई जेव्हा मला भेटली तेव्हा हिंदुस्थानी अधिकारी तिला ओरडत होते, त्यामुळे ती घाबरली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.भेटीच्या वेळी आईला माझी काळजी करू नको असं जाधव म्हणाले. माझी तब्येत पाहून आईला आनंद झाला. त्यासोबतच मी हिंदुस्थानी नौदलाचा एक अधिकारी आहे, असा दावा जाधव यांनी या व्हिडिओत केला आहे. कुलभूषण जाधव कुणाच्याही भीतीविना बोलत असल्याचे या व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ जारी करून पाकिस्ताननं जगासमोर आपली खोटी प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews